http://goo.gl/CTNvz – For Assal Marathi Sms Comedy Group


My page :- Assal Marathi Sms Comedy Group

‘ अरे संसार संसार ‘, ‘ मदर इंडिया ‘ सारख्या सिनेमांतील कथा वास्तवात उतरवत अशिक्षित पती-पत्नींनी कोणाचीही मदत न घेता स्वतःच विहीर खणण्याची किमया करून दाखवली आहे. निपाणीजवळच्या सौंदलगा गावातील दत्तात्रत मल्लू विभुते (वय ३८) आणि त्यांची पत्नी संगीता (३२) यांची ही कहाणी आहे.

वडिलोपार्जित अवघी ३० गुंठे शेती , त्यातही पाणी नाही , शिक्षण नाही , अठराविश्वे दारिद्र्य अशा प्रतिकूल परिस्थितीत या दाम्पत्याने केवळ जिद्दीच्या जोरावर हे शक्य करून दाखवले. तेही विहीर बांधणीचे कोणतेही शास्त्रीय ज्ञान , साधनसामग्री जवळ नसताना. केवळ मनाचा ठाम निर्धार करून या जोडप्याने एक जानेवारी २०१३ रोजी विहीर खणायला घेतली. टिकाव , बादली , दोरी , खोरे आणि घरातच बांबूच्या लाकडाला खिळे मारून तयार केलेली शिडी एवढेच साहित्य. रोज सकाळी पतीने खोदाई करायची , आणि पत्नीने नंतर येऊन दगड-माती काढायला मदत करायची. हे काम नऊ तास चालायचे. कधीमधी त्यांची मुले प्रियांका (९) आणि बाळासाहेब (१२) थोडा हातभार लावायची.

विहीर खोल गेल्यानंतर बांधकामाचा प्रश्न आला. त्यावेळी गवंड्याचीही भूमिका पतीनेच निभावली. बांधकाम सरळ रेषेत करण्यासाठी पारंपारिक ओळंब्याऐवजी बांबूच्या काठ्यांचा वापर केला. सिमेंट लावण्यासाठी थापीऐवजी भात वाढण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या पळीचा वापर केला. फक्त १५ पोती सिमेंट आणि चार हजार भाजीव विटा एवढेच साहित्य बाहेरून विकत आणण्यात आले. पाच महिन्यांत २० फूट खोल आणि १६ फूट रूंद विहीर बांधून पूर्ण झाली आहे. ऐन उन्हाळ्यात विहिरीला पाणीही लागले आहे.

दत्तात्रय यांचे शिक्षण नववीपर्यंत तर संगीता अशिक्षित ; परंतु या दाम्पत्याने आपल्या भगीरथ प्रयत्नांनी गंगा दारात आणली. या विहिरीच्या पाण्यावर शिवार हिरवेगार करू. आम्हाला राबावे लागते , तशी वेळ मुलांवर येऊ नये , एवढीच आमची इच्छा आहे, असं विभुते दाम्पत्य सांगतं.