किल्ले नळदुर्ग

महाराष्ट्रातल्या मराठवाडा मधील उस्मानाबाद जिल्ह्यातील एक महत्वाचा किल्ला….

एका बाजूने नदी,उरलेल्या बाजूने भक्कम तटबंदीने अभेद्य भुइकोट किल्ला..

विस्तारने प्रचंड असणारा हा किल्ला पाणीस्थापत्य कलेचा उत्कृष्ट नमुना म्हणून ओळखला जातो….

इथून पडणार्या नर अणि मादी धबधब्याचे दृष्य तर निव्वळ अप्रतिमच हो..उपळ्या बुरुज,परंडा बुरुज,संगम बुरुज,संग्राम बुरुज,नगर बुरुज,पुणे बुरुज यांसारख्या अनेक बुरुजांनी किल्ल्याची अभेद्यता वाढवलीये….

सहसा न दिसून येणारी वेगळी स्थापत्यशैली दिसून येते आणि त्याचे उत्कृष्ट उदहारण म्हणजे पाकळी बुरुज होय..एकदातरी हा बुरुज पाहून याचा आकार याचा रांगडा पणा पहावाच….

उपळ्या बुरुजाची बांधणीच वेगळी हो….आधी बुरुज बांधला मग तोफा चढ़वल्या मग पायर्या बांधल्या….वरी
ल फोटोवरुन समजून येईलच….

हत्ती दरवाजा,हुरमुख दरवाज़ा सारखे मुख्य दरवाजे,अजस्र तोफा,अभेद्य तटबंदी,भीमसेन सक्सेना यांचे एकांतवासाचे ठिकाण….अशा एक न अनेक गोष्टीने परिपुर्ण असा पाण्याने वेढलेला भुइकोट पावसाळ्यात पाहणे म्हणजे निव्वळ सुख हो….