गेल्या सातशे-आठशे वर्षांत मराठी भूमीवर दोनच अलौकिक सोहळे साजरे झाले. पहिला सोहळा साजरा झाला शके १२१२, म्हणजे इ.स. १२९० मध्ये. श्री ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी लिहून पसायदान मागितलं. मराठी भाषेत श्री ज्ञानेशांनी अमृताच्या शब्दांनी अभिषेक केला.

दुसरा सोहळा साजरा झाला ज्येष्ठ शुध्द त्रयोदशी, शके १५९६ या दिवशी रायगडावर. अवघ्या महाराष्ट्राने श्री शिवरायांच्या छत्रचामरांकित सुवर्ण सिंहासनावर सार्वभौमत्वाचा राज्याभिषेक केला.

शिवरायांचे कार्य आणि कर्तुत्व जगाला कळवून द्यायचे असेल तर छत्रपती शिवरायांचा राजाभिषेक ६ जूनला मोठ्या उत्साहात आणि प्रबोधनात्मक रीतीने राष्ट्रउद्धाराचा कार्यक्रम म्हणून राष्ट्रीय स्वातंत्र्य दिन या नात्याने साजरी करूया .

|| जय जिजाऊ || जय शिवराय || जय शंभूराजे ||