सुमारे सहा हजार वर्षापुर्वि एक मत भारतात उदयास आले होते..ज्याचे नाव ” तांत्रिक मत”  ह्या मताचा उदय बंगाल मधे झाला व त्याचा विस्तार बर्मा.तिबेट चिन पर्यंत होत गेला..  पुढे या विचाराचे अनेक ग्रुप्स झाली..व मतमतांतरे वाढत गेली समाज सुधारकानी पण या तान्त्रिंक मतावर तुफान हल्ले चढवले व आज हे मत.. साधना कालाच्या उदरात लुप्त पावले.  तांत्रिक मत” मानणा~या व अभ्यासणा~या लोकानी एका मोठ्या महा विद्यालयाची स्थापना मध्य प्रदेशातिल मुरेना या गावि स्थापना केली होति.. पण आज ते महाविद्यालय भग्नावस्थेत उभे आहे..
हे विशाल महाविद्यालय एका डोंगरावर वसलेले असुन त्याला “६४ योगीनी मंदीर” असेहि नाव आहे.. महाविद्यालय गोलाकार असुन मिटर त्रीज्या असलेले आहे व त्याला ६४ खोल्या आहेत  महा विद्यालय गोलाकार असुन मध्यभागी विश्वाचा महान तांत्रीक भगवान शंकराची मुर्ति आहे..
असे म्हटले जाते कि आज संसदेची जी इमारत आहे ति या विद्यालयाची कॉपी आहे  तांत्रिक व तंत्र विद्येस समाजात मान्यता नव्हति..मकार साधना..शव साधना ..नरबळी..मैथुन असे प्रकार असल्याने सभ्य समाज त्या पासुन दुर होता.
जस जसा समाज सभ्य बनु लागला तस तसा ह्या प्रकावर प्रखर टिका होवु लागली व ब्रिटिश आल्यावर ह्या साधनावर बंदी पण आली कारण त्यात बळी आदी अघोरी प्रकार होते..

शिवानं सखी पार्वतीला सूत्ररुपानं सांगितलेली सत्यप्राप्तीची गुह्य असं त्या प्रणालींचं स्वरुप आहे. सिद्ध पती आणि सत्योन्मुख पत्नीतला तो हृद्य संवाद आहे. महावीरानं साक्षात्काराला The ultimate unfoldment of Self म्हटलंय (Osho on Mahavir). तर अशी स्वतःला सर्वतोपरी अन्फोल्ड करायला तयार असलेली सखी आणि तिच्याशी अनिर्बंध संवाद साधू शकणारा शिवासारखा सिद्ध यांनी तंत्रसाधनेची सर्वांग खुली केलीयेत

आज हि विद्या शेवटचे श्वास घेत आहे असे म्हटले तर वावगे ठरणार नाहि..