आपल्या हिंदू संस्कृतीत व्रताना खूप महत्व आहे.पूर्वींच्या तुलनेत सध्याची स्त्रीहि अधिक सुशिक्षित झाल्यामुले वेलआणि पैसा यांना महत्व येऊन व्रतांचे महात्म्य कमी झाले.आज
‘लीव इन रिलेशनशिप “चा जमाना आहे. त्यामुळे वटपौर्णिमा कालबाह्य ठरते आहे.दुर्दैवानेया व्रतांमागीलनेमका हेतू विधी आणि फळ याची माहिती नसल्याने व्रत म्हणजे उपवास व पूजा अशीच संकल्पना धृढ होते आहे.उपवास म्हणजे भरपूर फराळाचे पदार्थखाणे व पूजा म्हणजे अवडंबर माजवून दिखावा करणे,यामुळे आधुनिक पिढीला त्यातील महत्व कळत नाहीये.असो. कुठल्याही व्रताची ५ अंगे आहेत. संकल्प,पूजा, उपवास, दान व विशिष्ट आचार,हि होत.कोणत्याही व्रताची सुरवातसंकल्पानेच करावी.व्रताच्या दिवशी फलाहार करावा .पण फलाहाराचे भ्रष्ट रूप फराळ होऊन रोजच्या जेवणासारखे पदार्थ खाल्ले जातात. हे सर्व पदार्थ पित्त वाढवणारे व पचनाला जड असल्याने त्याचा त्रासाचहोतो.हि व्रते करताना आपल्या पूर्वजांनी वयाचाही विचार केला आहे .सर्वसाधारण ५० वर्षापर्यंतच व्रते आचरावी. एकदशि सारखे व्रत मात्र शेवटपर्यंत केले जाते.खर म्हणजे पती-पत्नीचे एकमेकवर खरे प्रेम असेल तरच वटपौर्णिमा साजरी करण्यात अर्थ आहे.दोघातील स्नेहबंध धृढ करणारा असा हा सण आहे.
सावित्रीने आपल्या पतीचे प्राण परत मिळविण्यासाठी यामराजना आपल्या भक्तीनेसंतुष्ट करून आपल्या पतीचे प्राण परत्र मिळविले. अशी आख्यायिका पुराणात आहे,
करुनी निश्चय मनासी,नारद बोले सावित्रीसी;
ज्येष्ठमास त्रयोदशी , करुनी पूजन वदासी ;
त्रिरात्र व्रतकरुनी, मागे औष्य चुड्यासी;
येईल यम छालावाया ,शरण जी तयापासी………….
वटसावित्री व्रताची सुरवातपौर्णिमेच्या आधी दोन दिवस होते. सौभाग्य मीळो ; वटवृक्षाप्रमाणे कुल वाढो;अशीभावना या व्रतामागे असते. प्रत्येक दिवशी १०८ प्रमाणे ३ दिवस वडाला प्रदक्षिणा घालतात. ३ दिवस उपवास करतात.पण कालमानानुसार यात बदल झाला आहे.हे व्रत १ च दिवस म्हणजे ज्येष्ठ शुद्ध पौर्णिमा या दिवशी केले जाते.
पुजेची तयारी करताना हिरव्या बांगड्या,कापुर, पुजेची कापसाची गेजवस्त्रे, गळेसर ,विड्याची पाने,सुपारी ,पैसे,पंचामृत वगुलखोब्रर्याचा नैवेद्या ५ आंबे ,दुर्वा वगै. इत्यादी साहित्याची तयारी ठेवावी.
प्रत्यक्ष पूजेला सुरवात करताना प्रथम सुपारीच्या गणपतीची स्थापना करावी. हळद -कुंकू ,गंध ,लाल फुल अक्षतायांनी गणपतीची पूजा झाल्यावर वादाची किंवा वादाचे चित्र असणाऱ्या कागदाची पूजा करावी.
या दिवशी उपवास करावा. वाडापुढे आंबे व पैसे ठेवावे.५ सवाष्णीची आंबाव गव्हाने ओटी भरावी. काही ठिकाणी १ वाण घरात ठेऊन बाकीची इतर ४ घरी जाऊन देतात. वडाला ३ प्रदक्षिणा घालाव्या. वडाला गुंडाळायचा दोरा तिहेरी आसतो.विवाहानंतर सुवासिनी असेपर्यंत प्रत्येक स्त्रीने हे व्रत करावे.हे सौभाग्यावार्धक व्रत आहे.
आधुनिक काळात अगदी जन्मोजन्मी हाचपती मिळावा हे मागणे सयुक्तिकनसले तरी निदान आहे या जन्मात आपल्या सह्चाराच्या विचारांशी मुलांसमोर सहमती दाखवून नंतर सावकाश त्याचे दोष त्याला
समजावता येतात. तसेच वेळ नाही म्हणून वादाची फांदी आणून पूजा करणे हे मुळीच योग्य नाही. ज्या वृक्षाची आपण पूजा करतो त्याच्याच फांद्या तोडून त्यांची पूजा करणे हे हास्यास्पद आहे. त्यासाठी घरी पाटावर
वडाचे चित्र गंधाने काढून त्याची पूजा करावी.या व्रतास “ब्रह्मसावित्रीची पूजा ” असेही म्हणतात.
आपण ठरवले तर फक्त “वटपौर्णिमा” च नाही तर इतर सण उत्सव, व व्रते यांना मुळ स्वरूपाला बाधा न आणू देता नवे स्वरूप देऊन जपता येतील. भक्तीने केलेलीसाधी पूजा हि मला पोहोचते.असे भगवंतच सांगतात. असो .नवीन दृष्टीकोन स्वीकारून हि वटपौर्णिमा आपणसाजरी करूया.